बार्शी- बा विठ्ठला आम्हाला माफ कर आता तुझी चंद्रभागा आज सीनेला ओलांडून बार्शीतील भगवंताच्या चरणाशी जात आहे, आणि पुढे वैरागच्या संतनाथाच्या दर्शनासाठी धावत आहे. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी उजनीतील चंद्रभागेचे पाणी बार्शी तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविल्याशिवाय आपल्यााला चैन पडणार नाही, भगवंताच्या बार्शीत आपला जन्म झाला याचे सार्थक होणार नाही आणि तोपर्यंत आपले डोळेही मिटणार नाहीत असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
    बार्शी उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाणीपुजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिक्षक अभियंता ब.दा.तोंडे, कार्यकारी अभियंता बा.शं.बिराजदार, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल, अरुण कापसे, नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे, अब्बासभाई शेख, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, आबा पवार, गटनेते नागेश अक्कलकोटे, मकरंद निंबाळकर, विकास पाटील, विजय ठोंगे, नगरअभियंता अजय कस्तुरे, ऍड्.विकास जाधव, राहुल कोंढारे, पोपट डमरे, रिझवाना शेख, निर्मला स्वामी, संगीता मेनकुदळे, विजया खोगरे, मंदाताई काळे, सौ.पठाण, शैलता सोडळ, विनायक गरड, शमशोद्दीन केमकर, विलासअप्पा रेणके, कुमार पौळ, कमलाकर पाटील, देविदास शेटे, अधिक्षक अभियंता ब.दा.तोंडे, बाबुराव जाधव, मुर्तूजभाई शेख, मनिष चव्हाण, बप्पा कसबे, अमोल गुडे आदी उपस्थित होते.
   
    ना.सोपल म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उजनी प्रसंगी नदीवर धरण बांधण्याच्या प्रसंगी हात जोडून विनम्रमणे विठ्ठलाची प्रार्थना केली आणि बा विठ्ठला शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आम्ही तुझी चंद्रभागा अडवत आहोत त्याबद्दल आम्हाला माफ कर असे म्हटले होते. कवि सुमंत यांच्या कवितेत पंढरीचा काळा माझ्या घामात नाही यांचीही आठवण केली. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा असल्याचे सांगत योजनेच्या सुरुवातीला आलेल्या कटू अनुभवांच्या आठवणी सांगतांना ही योजना होणारच नाही असे म्हणत अनेकांनी वेड्यात काढले, काही जण म्हणाले तुझ्या बापानी तरी असे पाणी आणले होते का?, आपण अनेक तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन चिकाटीने माहिती घेतली या योजनेची यशस्वीता होणार याची चात्री पटल्यावर आपले नेते शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन परवानगी घेतली. सन १९९५ साली अपक्ष असतांना मनोहर जोशी यांच्याकडून योजनेसाठी सकारात्मक चर्चा केली यावेळी विनाशर्त पाठींबा देऊन एकाच दिवशी सर्व प्रशासकीय मान्यताही घेतल्या. बोगद्यासारखी योजना, उपसा सिंचन, भिमा सीना जोड आदी स्वप्नवत गोष्टी पूर्णत्वाकडे जात असतांना अत्यंत समाधान वाटत होते. केल्याने होत आहे रे प्रमाणे काम सुरु ठेवले. रडत बसायचं नाही तर सतत काम करुन लढत रहायचं ही नेते शरद पवार यांची शिकवण आम्ही आचरणात आणली. या कामासाठी सातत्याने निधीची उपलब्धता करण्यात आली परंतु आपल्या हातात सत्ता नसतांना ही योजना रखडली. त्यानंतर वैरागसह सर्व जनतेने आपल्या हाती सत्ता दिल्यावर पुन्हा विकासाची गती पूर्वीपेक्षा जास्त वाढली. छाणलोट क्षेत्र, तलाव, बंधारे यांचे भरीव काम करण्यात आले. केवळ एकाचा योजनेसाठी नाही तर तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या कामांसाठी विकासाची गती दिली. अधिकारी वर्गाकडून अत्यंत चांगले सहकार्य मिळाले त्यामुळेच चांगले काम करणे शक्य झाले. पाच वर्षांत कधीही विश्रांती घेतली नाही. फेडरेशनच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती हमीभावात धान्याची खरेदी करण्यात आली त्याचा अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फायदा झाला. पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याचा हजारो ग्रामपंचायतींना फायदा झाला व रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना सुरु झाल्या. हगणदारीमुक्तीचे काम जोमाने सुरु झाले. नगरपालिकेची सत्ता आल्यानंतरच एमआयडीसी करिता पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळेच त्याचे काम अंतीम टप्प्यात आले. शहरातील रस्ते, पाणी, गटारी, दिवाबत्ती यांचे काम नगरपरिषदेच्या मार्फत चांगले करण्यात आले सर्व घटकांतील नागरिकांची कामे मार्गी लावली. आज योगायोगाने पोळा आहे, हा तर माझाच सण आहे, ज्याप्रमाणे शेतातील बैल वर्षभर शेतामध्ये कष्ट करुन मालकाची सेवा करतो त्याप्रमाणे पाच वर्षे आपण जनतेची सेवा केली आहे. निवडणुकीच्या वेळी उत्सवाच्या स्वरुपात आपला पोळा साजरा करण्यात येतो.

अज्ञात विरोधकाकडून अडचणीचा प्रयत्न
     बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या उजनी उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाणी पुजनाने अस्वस्थ झालेल्या अज्ञात विरोधकांकडून कोनशीला फोडण्याचा तसेच विजेचे कनेक्शन तोडण्याचा कुत्सीत प्रकार करण्यात आला. यामुळे शेतकर्‍यांना रिधोरे येथे पंपगृहाजवळ पाणी पुजनासाठी जावे लागले यावेळी सर्व काम व यंत्रणा पाहून शेतकरी थक्क झाले होते. यावेळी शेतकरी म्हणाले आमच्या हृदयावर सोपल यांच्या नावाची कोनशीला कोरली आहे ती कशी फोडणार, कोंबडे झाकले म्हणून काय होणार अशा प्रतिक्रियाही यावेळी दिल्या.

 
Top