पांगरी - पांगरी ता.बार्शी पोलिस ठाण्याच्या हदीत आत्महत्या करण्याची मालिका सुरूच असून शिंदीच्या नशेत एका तरुणान व्यापा-याने  स्वत; गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.26 मंगळवारी सकाळी पांगरी ता.बार्शी येथे उघडकीस आली.
   मनोज संजय गवळी वय 35 रा.पांगरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सुभाश मचिंद चांदणे वय 45 रा.पांगरी यांनी पांगरी पोलिसात घटनेची खबर दिली आहे.चांदणे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत मनोज गवळी याने आज पहाटे शिंदीच्या नशेत घरासमोरील उंबराच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.पांगरी पोलिसात चांदणे यांच्या खबरीवरुण अकस्मात मयत  म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सरवदे हे  करत आहेत.
 
Top