पांगरी - पोळ्याच्या सनानिमित्त महादेव मंदिरात देव-दर्शनासाठी गेलेल्या एका तरुणाचा दुचाकीवरून पडून जागेवरच मृतू झाल्याची घटना काल दि.25 सोमवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास तावडी ता.बार्शी शिवारात घडली.सुभान मैनूदीन शेख (वय 31) रा.तावडी असे मोटरसायकल अपघातात जखमी होऊन मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
समीर अल्लाऊदीन शेख वय 26 रा.तावडी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मेहुणा मयत सुभान शेख हे काल दि 25 सोमवारी रात्री बैल पोळा व अमावशया असल्याने गावातील दशरथ रानबा कसबे यांच्या मालकीची एम.एच.13 एए.6506 ही दुचाकी घेऊन गावाजवळील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते.देव-दर्शन आटोपून ते गावाकडे येत असताना तावडी शिवारातील पाशुदीन महिबूब शेख यांच्या शेताशेजारील चारीत ते पाऊस पडल्याने दुचाकीसह पडून डोक्यास गंभीर मार लागून जखमी होऊन मयत झाले.पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे।
----------------
पांगरी - पांगरी ता.बार्शी पोलिस ठाण्याच्या हदीत आत्महत्या करण्याची मालिका सुरूच असून शिंदीच्या नशेत एका तरुणान व्यापा-याने  स्वत; गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.26 मंगळवारी सकाळी पांगरी ता.बार्शी येथे उघडकीस आली.मनोज संजय गवळी वय 35 रा.पांगरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सुभाश मचिंद चांदणे वय 45 रा.पांगरी यांनी पांगरी पोलिसात घटनेची खबर दिली आहे.चांदणे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत मनोज गवळी याने आज पहाटे शिंदीच्या नशेत घरासमोरील उंबराच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.पांगरी पोलिसात चांदणे यांच्या खबरीवरुण अकस्मात मयत  म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सरवदे हे  करत आहेत.



 
Top