बार्शी- बार्शी शहर व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या बार्शी उपसा सिंचनचे काम प्रगतीपथावर असून सोमवारी त्याच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम होत आहे. उपसा सिंचन हे बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकारत असल्याने आपल्याला खूप आनंद होत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी म्हटले.
    शनिवारी दि.२३ रोजी अग्निसुरक्षा बळकटीकरण योजने अंतर्गत नवीन अग्निशमन केंद्राची उभारणी, कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण व मनोरंजन उद्यान (ऍम्युझमेंट पार्क) कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल, नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, आबा पवार, गटनेते नागेश अक्कलकोटे, नगरअभियंता अजय कस्तुरे, ऍड्.विकास जाधव, राहुल कोंढारे, रिझवाना शेख, संगीता मेनकुदळे, विजया खोगरे, शमशोद्दीन केमकर, विलासअप्पा रेणके, देविदास शेटे, अधिक्षक अभियंता ब.दा.तोंडे, बाबुराव जाधव, मुर्तूजभाई शेख, सुशांत चव्हाण, मनिष चव्हाण, बप्पा कसबे, अमोल गुडे, कुमार माळी, विश्वास शेंडगे, लालूभाई सौदागर, प्रकाश पोकळे, हरिश्चंद्र ननवरे, उमेश साळुंखे, अजित बाबर, पिंटू चव्हाण, सचिन मांगडे आदी उपस्थित होते.
 
Top