तुळजापूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या स्‍वागताचे तुळजापूर शहरात विविध लावण्‍यात आलेले सोलापूरचे माजी खासदार यांचे पोस्‍टर काही अज्ञातांनी फाडले आहेत. विशेष म्‍हणजे पोस्‍टवरील अन्‍य नेत्‍यांचे फोटो अन फाडता फक्‍त सुभाष देशमुख यांचाच फोटो फाडल्‍याने भाजपांतर्गत कुरबूर पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. हा प्रकार शनिवार दि. 16 ऑगस्‍ट रोजी उघडकीस आला.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार तथा लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी तुळजापूर शहरात विविध ठिकाणी शुभेच्छापर डिजिटल होर्डींग्ज लावले होते. या होर्डींग्जवर नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुभाष देशमुख यांचाही फोटो होता. हे डिजिटल शहरातील नळदुर्ग मार्ग, लातूर मार्ग व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभारण्यात आले होते. शनिवारी सकाळी या होर्डींग्जवरील सुभाष देशमुख यांचाच फोटो फाडण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चर्चेचा विषय होता.
 
Top