सोलापूर -: देशाच्या प्रगतीसाठी तसेच कृषी व औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने रस्ते विकासाच्या कामाला प्राधान्य देण्याचे नियोजन केले आहे असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पुणे - सोलापूर या एन एच 9 या रस्त्याचे तसेच 765 के.वी. सोलापूर - रायचूर ट्रान्समिशन लाईनचा लोकार्पण सोहळा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शनिवार रोजी सोलापूर येथील होम मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय रस्ता वाहतुक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विद्युत व कोळसा राज्यमंत्री पियुष गोयल हे उपस्थित होते.
वीज, पाणी व रस्ता या तीन क्षेत्रांना केंद्र शासनाने प्राधान्य दिले असून पायाभूत सुविधा कृषी व औद्योगिक क्षेत्रांना उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासन नियोजन करत आहे असे मोदी यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन करुन देशातील जनतेला 365 दिवस व 24 तास वीज उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबध्द आहोत असे ते म्हणाले.
वीजेची बचत प्रत्येकाने व आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे त्यामुळे देशाची फार मोठी सेवा केल्याचे समाधान मिळेल. देशामध्ये मातीतून सोने पिकविण्याची ताकद शेतक-यामध्ये आहे असा गौरव करुन युवा पिढीच्या क्षमतेचा उपयोग देश सामर्थ्यवान व समृध्द राष्ट्र बनविण्यासाठी करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री सडक योजनेच्या कामाला गती देऊन देशामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करुन यामधून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबर पर्यटन क्षेत्रही वाढविण्यावर भर दिला जाईल असे मोदी यांनी सांगितले.
टेक्सटाईल उद्योगाला चालना देणार
सर्वसामान्य गरीबांचा असलेला सोलापूरमधील टेक्सटाईल उद्योगाला चालना देणार व या उद्योगातून तयार होणा-या मालाला राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोळसा खाणीतून कोळसा तसेच वीज व गॅस महाराष्ट्र राज्याला उपलब्ध करुन दिला असे सांगितले. दरवर्षी नर्मदा प्रकल्पातून 400 कोटीची वीज मोफत महाराष्ट्र राज्याला दिली जाईल असे मोदी यांनी भाषणात सांगून ट्रान्समिशनद्वारे देशातील राज्यांना वीज उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रमही प्राधान्याने राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन केले. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन इंटरनेटद्वारे एकमेकांना गावे जोडण्याचाही कार्यक्रम केंद्र शासनाने हाती घेतला आहे असे सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पाचे उदघाटन आज होत आहे. राज्यामध्ये गेले तीन वर्ष दुष्काळ पडल्यामुळे जलविद्युत प्रकल्पासाठी प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली त्यामूळे निर्मितीवर परिणाम झाला आहे. केंद्र शासनाने विद्युत निर्मितीसाठी कोळसा व गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणी केली. तसेच पुणे - बेंगलोर हायवे मधून सह्याद्री रांगामधून कोकणात जाण्यासाठी बोगदा खोदण्याकरीता परवानगी द्यावी हा प्रकल्प पूर्ण झाला तर राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे हे स्थान कायम राहण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन केले.
केंद्रीय रस्ते व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आळंदी - पंढरपूर व देहू - पंढरपूर या ज्ञानेश्वर व तुकाराम पालखी मार्गाचा चार पदरी सिमेंटचा रस्ता तसेच सोलापूर - अक्कलकोट - गाणगापूर - गुलबर्गा या चार पदरी सिंमेंटचा रस्ता करणार असल्याचे सांगून रस्त्याच्या माध्यमातून देश सुखी व समृध्द करण्याचे ठरविले आहे असे सांगितले.
केंद्रीय कोळसा व विद्युत राज्यमंत्री पियुष गोयल यांनी स्वस्त व पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करुन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण असून देशाच्या कानाकोप-यात वीज उपलब्ध करुन देऊन अंध:कारमुक्त भारत करण्याचा निश्चय त्यांनी आपल्या भाषणात केला.
प्रास्ताविक भाषणात सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी स्वागत केले. या समारंभास विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रविंद्र गायकवाड, आमदार चंद्रकांतदादा पाटील,आ.विजय देशमुख, आ. सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषद व विविध संस्थांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य शासनाचे सनदी अधिकारी व नागरिक व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.