उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील 243-परंडा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 155 अर्जांची विक्री झाली तर आज परंडा विधानसभा मतदारसंघात 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     परंडा विधानसभा मतदार संघात मोटे राहूल महारुद्र- 2 (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी / अपक्ष), मोटे वैशाली राहूल-2 (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी / अपक्ष), पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब-2        (शिवसेना/ अपक्ष),  कुकडे राजगुरु ‍त्रिंबकराव-2 (भारतीय शेतकरी कामगार पक्ष/ ‍हिंदुस्थान जनता पार्टी),‍ अहिरे प्रबुध्द साहेबराव-2 (बहुजन समाज पार्टी/हिंदुस्थान जनता पार्टी), मुलाणी अमीर छगन (अपक्ष), गणेश दत्तात्रय शेंडगे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), चौधरी नुरोद्दीन  म. युनुस म. इद्रिस-3 (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस -आय),  हावरे अ.करीम.म.युसूफ (अपक्ष), सुर्यकांत चंद्रकांत कांबळे (अपक्ष), अमेय बाळासाहेब पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), शिंदे संभाजी नानासाहेब (अपक्ष), खैरे कमलाकर रामलिंग-2 (लोकजनशक्ती पार्टी/ अपक्ष), बाळासाहेब भगवंतराव पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष),  विलास ‍मल्लीकार्जून वायकुळे (अपक्ष), भोरे गोरख चांगदेव (अपक्ष) आणि  पडघन नानासाहेब ज्ञानदेव (अपक्ष) अशा 17 उमेदवारांनी   एकूण 25 नामांकनपत्र दाखल करण्यात आले आहेत.
 
Top