उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी  अखेरच्या दिवशी  147 अर्जांची विक्री झाली मात्र केवळ  17 उमेदवारांनी 24 नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने  कळविले आहे. 
     उमरगा विधानसभा मतदार संघात चौगुले ज्ञानराज धोंडीराम  (शिवसेना), तेलंग  दिलीप साहेबराव-2 (राष्ट्रवादी कॉग्रेस/अपक्ष), शिंदे कैलास चिंतामणराव (भारतीय जनता पार्टीचे -2),कांबळे प्रज्ञावर्धन भगवान  (नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी ), गायकवाड संजय आत्माराम -2 (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), गायकवाड तानाजी वैजनाथ-2  ( बहुजन समाज पार्टी ), वाघमारे विद्या आबाराव (रिपब्लीकेशन पार्टी ऑफ इंडिया), सुर्यवंशी सुनिल वामनराव (अपक्ष), कांबळे किसन नागनाथ-2 (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), सरवदे रावसाहेब श्रीरंग (अपक्ष),क्षिरसागर विजय मारुती-2 (मनसे),  क्षिरसागर ईश्वर मल्लारी (अपक्ष), सरवदे सतिश ज्ञानोबा-2 (अपक्ष/ मनसे), कोनाळे बालाजी एकनाथ (अपक्ष), दत्ता लक्ष्मण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), कांबळे लक्ष्मण तुकाराम (अपक्ष) आणि सचिन  जयहिंद देडे (राष्ट्रवादी कॉग्रेस) अशा  एकूण 17 उमेदवारांनी 24 नामांकनपत्र दाखल केले आहेत.
 
Top