तुळजापूर - तुळजापूर विधानसभा मतदार संघ अनेक राजकीय घडामोडीने गाजत आहे.  काहींनी उमेदवारी जाहीर झाली म्‍हणून फटाके फोडले तर काहींनी उमेदवारी मिळणार हे निश्चित समजून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या सर्वांचा मोठा आपेक्षा भंग झाला आहे. या मंडळींना उमेदवारी मिळालीच नाही. कॉंग्रेस व मनसेच वगळता, भाजप शिवसेना व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने या मतदार संघात स्‍थानिकांना उमेदवारी न देता मतदार संघाबाहेरील मंडळींना उमेदवारी देऊन स्‍थानिकांवर मोठा अन्‍याय केला आहे. दरम्‍यानयेथे पंचरंगी निवडणुक होत असली तरी ख-या अर्थाने दुरंगी लढत रंगणार असल्‍याचे बोलले जात आहे. 
   राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने जीवनराव गोरे शिवसेनेने सुधिर पाटील व भाजपाने संजय निंबाळकर, यांना उमेदवारी दिली आहे. वास्‍तविक पाहता या तिनही उमेदवारांचा या मतदार संघाशी कुठलाच संबंध नाही की त्‍यांचे या मतदार संघात कुठलेच कार्य देखील नाही. अशांना या तीन प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली हे समजत नाही. तुळजापूर विधानसभा मतदार संघात लादण्‍यात आलेल्‍या या गेटकेन उमेदवारावर त्‍या त्‍या पक्षातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात नाराज असल्‍याचे दिसून येत आहे. याचा मोठा फटका निवडणूकीत त्‍यांना बसणार असल्‍याचे दिसते. या गेटकेन उमेदवारामुळे या मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या विजयाचा मार्ग सुखकर होत चालला आहे. 26 सप्‍टेंबर रोजी विराट शक्‍तीप्रदर्शन करीत ना. चव्‍हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्‍यापूर्वी काढण्‍यात आलेल्‍या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. त्‍यामुळे हा मतदार संघ कॉंग्रेसचा बालेकिल्‍ला असल्‍याचे पुन्‍हा एकदा दिसून आले. ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या विजयासाठी या मतदार संघासह संपूर्ण जिल्‍हयातील कॉंग्रेस एकदिलाने परिश्रम घेत आहे. इतर पक्षातील फरक दिसून येतो. या मतदार संघात आणखी एक नाटयमय राजकीय घटना घडली. या मतदार संघातून प्रारंभी मनसेची उमेदवारी तुळजापूर येथील मनसेचे जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर यांना जाहीर झाली होती मात्र त्‍यानंतर अचानक मनसेची उमेदवारी देवानंद रोचकरी यांना जाहीर करण्‍यात आली. त्‍यामुळे ही विधानसभा निवडणूक देवानंद रोचकरी हे मनसेकडून लढविणार आहेत. रोचकरी यांना मनसेची उमेदवारी मिळाल्‍याने मनसे कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे. मात्र विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात मनसेचे अवाहन उभे करण्‍यासाठी मनसे कार्यकर्त्‍यांना मोठे परिश्रम घ्‍यावे लागणार आहेत. कारण या मतदार संघात मनसेची राजकीय ताकद अतिशय नगन्‍य समजली जात आहे. मनसेची जामेची बाजू म्‍हणजे देवानंद रोचकरी यांना उमेदवारी मिळाल्‍याची होय. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा या मतदार संघात आता पुर्वीप्रमाणे कॉंग्रेसचे ना. मधुकरराव चव्‍हाण व मनसेच देवानंद रोचकरी यांच्‍यात चुरशीची लढत होण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
 
Top