नळदुर्ग – विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावे व जनतेनी  नवरात्र महोत्‍सव उत्‍साहाने साजरा करावा , याकरीता कायदा व सुव्‍यवस्‍था  अबाधीत रहावे, याकरीता  पोलिसांनी  खबरदारीचे आवश्‍यक ते उपाय योजना केली आहे . त्‍यांचाच एक भाग म्‍हणुन विविध कलमांतर्गत 189 लोकांवर प्रतिबंधात्‍म कारवाई केली आहे. त्‍याचबरोबर कोणते‍ही बेवारस वस्‍तू किंवा संशयित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास भाविक, नागरिकांनी तात्‍काळ नळदुर्ग पोलीसांशी संपर्क साधण्‍याचे अवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्‍याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.वाय. डांगे यांनी केले.
   विधानसभा निवडणूक व नवरात्र महोत्‍सव शांततेत पार पाडण्‍यासाठी नळदुर्ग पोलिसानी सर्वतोपरी तयारी केली आहे. विधानसभा निवडणूक व नवरात्र महोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्‍हेगार प्रवृत्‍तीच्‍या जवळपास 189 लोकांवर विविध कलमान्‍वये प्रतिबंधात्‍मक कारवाई केली आहे. यामध्‍ये फौजदारी प्रक्रिया संहितेतील विविध कलमान्‍वये 189 लोकांना नोटीसा बजावण्‍यात आल्‍या आहेत. पायी चालत जाणा-या लोकांच्‍या सुरक्षिततेसाठी 24 तास नळदुर्ग – तुळजापूर या मार्गावर पोलिसांची गस्‍त  सुरू करण्‍यात आाली आहे. यासाठी पाच पथकांची नेमणूक करण्‍यात आली आहे. भाविक किंवा नागरिकांना कोणतीही बेवारस वस्‍तू ,ज्‍यामध्‍ये बॅग, खेळणी, टेपरेकॉर्डर, रेडिओ, इलेक्‍ट्रानिक साहित्य आढळल्‍यास  किंवा एखादी संशयित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यस तात्‍काळ पोलिसाशी  संपर्क साधण्‍याचे अवाहन सपोनि. डांगे यांनी केले आहे.
 पावसामुळे नळदुर्ग जवळील सर्व तलाव आणि डॅममध्‍ये पाणी भरलेले आहे. आणि विहिरी तुडूंब भरल्‍या आहेत. त्‍यामुळे भाविकांनी स्‍नान करण्‍यासाठी काठावरच पाणी घ्‍यावे, अन्‍यथा अनर्थ होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. सिमकार्ड विक्रेत्‍यांनी सिमकार्ड विकताना त्‍यांचे नाव पत्‍याबाबात तसेच कागदपत्रांची खात्री झाल्‍यानंतरच सिमकार्डाची विक्री करावी, घरमालक किंवा दुकानमालक यांनी आपले घर आणि दुकान भाडयाने देताना अनोळखी परराज्‍यातील भाडेकरूंबाबत विशेष दक्षता बागळगून ,त्‍याची माहिती, नाव पत्‍ता व फोटो पोलिस ठाण्‍यात द्यावे, असे अवाहनाही करण्‍यात आले आहे. 
 
Top