उस्मानाबाद, दि.27- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील 242-उस्मानाबाद विधानसभा निवडणुकीसाठी  आज उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवारांचे 36 नाम निर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 
     उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात अर्चना राणाजगजितसिंह पाटील-2(नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी /अपक्ष), राणाजगजितसिंह  पद्मसिंह पाटील-2 (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी /अपक्ष), पाटील धनंजय मुरलीधर (हिंदुस्थान निर्माण दल), वाघमारे संजयकुमार भागवत ( बहुजन समाज पार्टी), अनिल उत्तमराव  हजारे (  रिपब्लीक सेना), वाजेद सलीम शेख (अपक्ष), हाजी भाई हन्नुरे ( अपक्ष), डॉ.रमेश सुब्बराव बनसोडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया),  पांडूरंग गणपतराव भोसले ( अपक्ष), शिंदे विश्वास जगदेवराव -4 ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस (आय)), प्रदीप पी.सिद्राम जाधव (अपक्ष),  चव्हाण बाबु विठ्ठोबा (हिंदुस्थान जनता पार्टी), टेकाळे ‍किरण ‍दिगंबर (अपक्ष), यादव संजयकुमार आत्माराम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), उमेश  भिवाजी  भालेराव ( बहुजन मुक्ती पार्टी ), दुधगावकर पाटील संजय त्रंबकराव -4( भारतीय जनता पार्टी), पठाण अकबरखान गुलाबखान -2 ( ऑल इंडिया मजलीस ए. इत्तेहादूल मुस्लीमीन ),  शिवाजी दिंगबर उर्फे  पांडूरंग कापसे-2 ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस/ अपक्ष), समीर रसीद  सय्यद ( ऑल इंडिया मजलीस ए. इत्तेहादूल मुस्लीमीन ), गायकवाड मधुकर रामलिंग  ( आंबेडकर राईट पार्टी   ऑफ  इंडिया), अनंत जगन्नाथ चोंदे ( भारतीय शेतकरी कामगार पक्ष), दुधगावकर पाटील चारुशिला संजय -2( भारतीय जनता पार्टी), चांदणे पिंटू  पांडूरंग (अपक्ष),‍‍‍‍स्मिता अभय शहापूरकर -2 ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आय / अपक्ष) असे एकूण 36 नामाकंनपत्र दाखल करण्यात आले आहे.

 
Top