उस्मानाबाद -  समाजाच्या सर्व स्तरातील युवक-युवतींना सैन्य व पोलीस भरतीचे प्रशिक्षण मेस्को करीअर ॲकॅडमी, सातारा येथे 27  ऑक्टोबरपासून  विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून  यात राहण्याची, जेवण्याची तसेच मैदानी व लेखी परीक्षेच्या तयारीची उत्तम सुविधा आहे. यासाठीच्या निवड प्रक्रियेकरीता मेस्को करीअर ॲकॅडमीचे प्रतिनिधी सैनिकी (मुलांचे) वसतिगृह खाजानगर, उस्मानाबाद येथे उपस्थित राहून 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता निवड प्रक्रिया घेतील.
    इच्छुक युवक-युवतींनी आपल्या सर्व शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.    
 
Top