पांगरी – गूढ आवाजाचे सत्र सुरूच असून आज दि.25 गुरुवारी दुपारी 12,50 वाजण्याच्या दरम्यान बार्शी तालुक्याच्या पूर्व भागात मोठा गूढ आवाज झाला.आवाज खूपच मोठा असल्याने व घटस्थापनेचा दिवस असल्यामुळे घरातच असलेल्या सर्व महिलासह लहान मुलेही घराबाहेर पडून आवाजाच्या दिशेने पाहत होती.आवाज मोठा असल्यामुळे जनतेमधुन घबराटीचे वातावरण दिसून येत होते.नेमके सन,उत्सव अश्या काळातच असे आवाज होत असल्यामुळे सर्वसामान्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.हा आवाज येरमाळा,ढोकी,येडशी,आगळगाव,चिखर्डे,आदि गावांसह शेजारील जिल्ह्यातही आला असल्याचे वृत आहे॰
  अलीकडे गूढ आवाज ऐकने नित्याचे होत असतांनाही आवाज आल्यास भूकंपाची आठवण येऊन घरातील सर्वजण घराबाहेर धावत येण्याची काळजी घेतात.येवढ्या मोठ्या प्रमाणात आवाज येऊनही प्रशासकीय पातळीवर याची कोणतीच नोंद होत नाही हे विशेष आहे.सैनिकांच्या सरावाच्या विमानाचे आवाज असावे,भूगर्भातील हालचालीचा परिणाम असावा,निसर्गाच्या बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम असावा, पोकळी निर्माण झाल्यामुळे असे आवाज होत असावेत अश्या वेगवेगळ्या करणांनाई एकमेकांचे समाधान केले जात होते.शासनाच्या संबंधित विभागाने एकदा होणारे हे गूढ आवाज नेमके कशाचे आहेत याबाबत जनतेला माहिती देऊन त्यांचा जीव भांड्यात टाकणे गरजेचे आहे.
 
Top