नळदुर्ग  - अणदूर ता.तुळजापूर  येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सध्या अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे.याप्रकरणी वरिष्‍ठ पातळीवरून चौकशी करून तात्‍काळ गैरसोय दुर करण्‍याची मागणी बँक ग्राहकातुन केली जात आहे.
   परिसरातील बारा गावांतील आर्थिक व्यवहार अणदुर येथिल या बँकेच्या माध्यमातून होतात.त्यामुळे बँकेत ग्राहकांची नेहमीच गर्दीअसते.या बँकेत बचत खात्यांची संख्या जवळपास ३५हजार आहे.याशिवाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, निराधारांचे अनुदान, शेतकर्‍यांना पीक कर्जवाटप, ही कामेही सुरूच असतात.सध्या या बँकेत एक शाखाधिकारी, एक अकौंटंट आणि तीन क्लार्कअशा पाच जणांवर बँकेचा कारभार सुरू आहे.त्यामुळे ग्राहकांच्या अनेक कामांना विलंब होत असून, येथील रिक्त पदे तातडीने भरावित, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
याबाबत बँकेचे शाखाधिकारी श्रीरंग पळणीटकर यांच्याशी संपर्कसाधला असता, बँकेतील एक क्लार्कसेवानवृत्त झाले असून, दुसरे नोकरी सोडून गेले आहेत.त्यांच्या जागेवर अद्याप कर्मचारी नियुक्त झाला नसल्याने ही दोन्ही पदे रिक्त आहेत.याशिवाय शिपायाचे पदही रिक्त आहे.ही पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
   भारतीय स्टेट बँकेने या ठिकाणी ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू केली आहे.येथे पैसे काढण्यासाठी ग्राहकांची नेहमी मोठी गर्दीअसेल.विशेष म्हणजे, शेजारच्या नळदुर्ग शहरात एटीएम सुविधा उपलब्ध नाही.नळदुर्गहे नगरपालिका असलेले शहर  असून, तेथील बाजारपेठही मोठी आहे.त्यामुळे तेथील ग्राहकही अणदूर येथील एटीएम सेवेचा लाभ घेतात.परंतु, असे असले तरी ही सेवा केवळ बँक वेळेतच सुरू राहत आहे.त्यामुळे ग्राहकांना ठराविक वेळेतच येथून पैसे काढावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.केवळबंदूकधारी सुरक्षा गार्डनसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 
Top