बार्शी - सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यावर्षीही बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याचा बहुमान प्राप्त झाला. सोलापूर येथील वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संघातील विद्यार्थ्यांनी तळमळीने केलेल्या उत्कृष्ठ कला प्रकारातील अभिनयामुळे गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्लचा बहुमान मिळविला आहे. विद्यापीठाच्या अकराव्या युवा महोत्सवाचे यजमानपद यंदा बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाकडे होते. नेहमीच्या सरावाच्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनात महाविद्यालयाला मिळालेला बहुमान हा घरच्या रंगमंचावर प्राप्त झाल्याने त्यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. या महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना सिने अभिनेत्री आदिती सारंगधर हिच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन. मचलदार, प्रशांत नलावडे, बी.वाय.यादव, सतिश वाघमारे, मधुकर फरताडे, रुपाली ऊारसे,ओंकार वायचळ, गुणवंत सरवदे, संदिप मिरगणे आदी उपस्थित होते.   
    उत्कृष्ठ पुरुष अभिनय १) शिवाजी महाविद्यालय,बार्शी २) अमृत ढगे, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय ३) सागर अचलकर, वालाचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर, उत्कृष्ठ स्त्री अभिनय १) मधुरा पानसे, शिवाजी महाविद्यालय,बार्शी, २) स्नेहल पोतदार, संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर, ३) मैथिली दळवी, दयानंद विधी महाविद्यालय,सोलापूर, उत्कृष्ठ संघ व्यवस्थापन १) सूर्यकांत शिंदे, अबोली सुलाखे, शिवाजी महाविद्यालय,बार्शी २) राजेश माळी, अमोल शिंदे, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर, ३) पंकज पवार, वसुंधरा कला महाविद्यालय,सोलापूर, गोल्डन बॉय - सागर अचलकर, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर, गोल्डन गर्ल - श्रध्दा हुलेनवरु, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर इत्‍यादी.
 
Top