उस्मानाबाद - १२ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून ४२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
विधानसभेसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज ६ व्या दिवशी जिल्ह्यातील ४२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पितृपक्षानंतर आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर तसेच आजचा शुभमुहूर्त असल्याचे भविष्य वेत्यांनी नेत्यांना सांगीतल्याने उमेदवारी भरण्यासाठी आज जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता आपले उमेदवारी अर्ज दाखल केले परंतू. उस्मानाबाद येथे आ. ओमराजे निंबाळकर यांनी तर तुळजापूर मधून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यातून चार मतदार संघातून ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये तुळजापूर मधून काँग्रेसकडून मधुकरराव चव्हाण यांनी, शिवसेनेकडून सुधीर पाटील यांनी, उमरग्यातून काँग्रेसकडून किसन कांबळे, कैलास शिंदे यांनी, भाजपाकडून, संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार अर्ज दाखल केले. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून आ. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेकडून तर परंडा मतदार संघातून बाळासाहेब हाडोंग्रीकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यातून सर्वच राजकीय पक्षानी आपले उमेदवार दिल्याने सर्वच पक्षांना आपल्या उमेदवारांसाठी आज उमेदवारी दाखल करण्यासाठी आजचा दिवस आहे.
 
Top