तुळजापूर - तुळजापूर मतदार संघाचा ख-या अर्थाने विकास झाला आहे. यात कांही खंत नाही कारण आज माझ्या समोर जनसमुदाय बसला असल्‍याचे  काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप राठी यांनी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचार शुभारंभाच्या  सभेत बोलताना सांगितले.
   विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी श्री. तुळजाभवानीचा आशिर्वाद घेवून मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भव्य शक्ती प्रदर्शन करीत रॅलीस सुरुवात केली. ही रॅली भवानी रोड, शुक्रवार पेठ, जिजामाता नगर या मार्गे हाडको मैदान येथे आयोजित केलेल्या सभेस्थळी पोहंचली. या रॅलीत प्रचंड कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिला कार्यकत्र्या हातात काँग्रेस पक्षाचे झेंडे घेतलेले दिसत होते. ग्रामीण भागातील मंडळींनी हालगीच्या तालावर नाचत गाजत घोषणेबाजी करीत होते. रॅली मोठ्या उत्साहात दिसत होती. या रॅलीचे रुपांतर हाडको मैदानावरील सभेत रुपांतर झाले.
यावेळी व्यासपीठावर औसाचे आमदार बसवराज पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील. जि.प. अध्यक्ष धिरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जिल्हा महिला कॉ. कमेटीच्या अध्यक्षा राजलक्ष्मी गायकवाड, अशोक मगर, जि.प. सदस्य काशिनाथ बंडगर, पंडित जोकार, काँग्रेसचे युवा नेते सुनिल चव्हाण, पं.स. उपसभापती प्रकाश चव्हाण, तालुका युवा अध्यक्ष सचिन पाटील, तालुका अध्यक्ष सिद्धाआप्पा मुळे, मुकूंद डोंगरे, शहाबाज काझी, महादेव खटावकर, संतोष बोबडे, संजय दुधगावकर, विश्वास आप्पा शिंदे, सुभाष वट्टे, लक्ष्मण सरडे, अशोक जवळगेकर, महिला ता. अध्यक्षा कल्पना मगर, शहर अध्यक्ष भारत कदम, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र हे विकासाच्या बाबतीत नंबर वन राज्य आहे. आम्ही आश्वासन व जातीवादावर मते मागत नाहीत. काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्यालाही सन्मानाने वागविले जाते. राज्यातील काँग्रेस पक्षाला आई तुळजाभवानी च्या दरबारातून शक्ती मिळत गेली आहे. जिल्
आपल्या भाषणात मधुकरराव चव्हाण म्हणाले की, आज प्रत्येक जण काँग्रेस पक्षाचा वटवृक्ष मोठा झाला आहे. पण आम्ही आज ही या वटवृक्षाखाली आहेत म्हणुन काँग्रेस पक्षावर गोर-गरिबांची पक्षावर श्रद्धा आहे. आपल्या भाषाणात स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्ष कसा वाढवून गोर-गरिबांच्या झोपड्या पर्यंत नेला. हे विसरणे चुकीचे आहे. तरी कार्यकत्र्यांनी काँग्रेस पक्षज्ञाने केलेली कामे जनतेसमोर मांडावीत आम्ही लोकांच्या विकासासाठी काम केले आहे. कांही मंडळी स्वताच्या स्वार्थासाठी आमच्या पासुन वेगळी गेली आहेत. आज येथे तुम्ही माझ्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने आला आहेत हीच मी केलेल्या कामाची पावती मिळाली.
ह्याचा अनुषेश भरुन काढण्यासाठी चव्हाण साहेबांना बळ द्या असे आवाहन केले.
 
Top