तुळजापूर - नवरात्रोत्सवाच्यादुस-या माळेला शुक्रवारी   भाविकांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्‍यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये कर्नाटक राज्यातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान पहाटे अभिषेक पूजेची रांग प्रांगण भरून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीबुवा मठापर्यंत गेली होती. गर्दीमुळे अनेक भाविकांना अभिषेक पूजेपासून वंचित रहावे लागले.
पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी दिवसभरात बावीस तास मंदिर खुले ठेवण्यात येत आहे. रात्री छबीना मिरवणुकीनंतर देवीचा गाभारा बंद करण्यात येत आहे. तर सकाळी सायंकाळी वाजता अशा दोन वेळेस देवीची दही, दुधाने अभिषेक पूजा करण्यात येत आहे. सायंकाळच्या पूजेनंतर रात्री १०.३० वाजता छबीना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्षा जयश्री कंदले, तहसीलदार सुजित नरहरे, दिलीप नाईकवाडी यांच्यासह देवीचे महंत तुकोजी बुवा, आजच्या पूजेचे मानकरी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, सुधीर कदम, कैलास पाटील, सचिन पाटील, राजेश मलबा, विकास मलबा, अनंतराव कोंडो यांच्यासह पुजारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
 
Top