तुळजापूर - नवरात्र महोत्‍सवाच्‍या दुस-या माळेला शुक्रवार रोजी श्री तुळजाभवानी देवी  मंदिराच्या गाभा-यात पुणे येथील देवी राहुल  ताम्हाणे या भक्ताने आकर्षक देशी, विदेशी फुलांची सजावट केली आहे. तुळजाभवानी देवीचे  अनेक भाविकांनी या चैतन्यदायी रुपाचे दर्शन घेतले.
शुक्रवार रोजी तुळजाभवानी मंदिरात रंगी-बेरंगी, देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्‍यात
आली . ऑरचिड, कारनेशियन, शेवंती, बेंगलोर शेवंती, बुजगुलाब आदी फुलांच्या सह्याने देवीचा मुख्य गाभारा, चोपदार दरवाजा, शेषघर, सिंहगाभारा, पितळी दरवाजा, निंबाळकर दरवाज्यासह भवानीशंकर, चिंतामणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले असून फुलांचा दर्वळ पसरला आहे. ताम्हाणे बंधू मागील चार वर्षांपासून शारदीय नवरात्र शाकंभरी नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिरात फुलांची सजावट करतात. यावर्षी हे त्यांचे पाचवे वर्ष आहे. गुरुवारी रात्रीपासूनच ते १० कामगार सजावट करत होते. या सजावटीसाठी ३५० ते ४०० फुलांच्या गड्डी लागल्याचे राहुल ताम्हाणे यांनी सांगि‍तले.
 
Top