उस्मानाबाद - भारत निवडणूक आयोगाचे मतदार जागरुकता निरीक्षक एम. नागेंद्र स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन इमारतीत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2014 साठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय प्रसिद्धी माध्यम कक्ष तसेच माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण कक्षाला भेट दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यावेळी त्यांच्यासमवेत होते.
    श्री. स्वामी यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यम कक्षात वर्तमानपत्र प्रतिनिधींसाठीच्या सुविधांची माहिती घेतली. याशिवाय, पेड न्यूज तसेच माध्यम सनियंत्रण व्यवस्थेची पाहणी करुन त्याबाबत सूचनाही दिल्या. चारही मतदारसंघाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रातील बातम्यांचे स्कॅनिंग केले जावे. पेड न्यूज आणि जाहिरातींवर लक्ष ठेवून त्यासंबंधीची माहिती संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खर्च विषयक कक्षाला कळवावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
    यावेळी प्रसिद्धी माध्यम कक्ष प्रमुख दीपक चव्हाण यांनी श्री. स्वामी व श्री. मुळे यांचे स्वागत करुन त्यांना माध्यम कक्षाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मतदार जागृतीबाबत माध्यम कक्षात लावलेल्या विविध पोस्टर्सचेही त्यांनी कौतुक केले.    
 
Top