पांगरी  (गणेश गोडसे)   दैनंदिन ताण,तनाव,तेच ते रहाटघाडगे याला वाट मोकळी करण्यासाठी व विरंगुळा करण्याच्या हेतूने, मन उल्हासित करण्यासाठी काही ठराविक दिवसाला प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन मन मोकळे करण्याची पद्धत अलीकडे चांगलीच प्रचलित होऊ पहात असून तीर्थक्षेत्र रामलिंग,येडेश्वरी,घारीचे नागनाथ,नीलकंठेश्वर मंदिर आदि अनेक तीर्थक्षेत्रे अलीकडील काळात पर्यटन स्थळे म्हणूनही उदयास येत असून महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओढा रामलिंग या तीर्थक्षेत्राकडे जास्त वाढत असल्याचे दिसत आहे.27 स्प्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा होतो.
  सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जिवनातुन वेळ मिळेलच याची खात्री नसून तरीही घरातून सहल,ट्रीप आदि बाबीसाठी घरातून विशेष प्राधान्य दिले जाते.समाजा समाजातील,राज्या राज्यातील,तसेच देश,परदेशातील दरी कमी करण्याच्या दृष्‍टीनेही पर्यटनाला महत्व आहे.केल्याने देशाटन अंगी येते शाहानपण ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरते.भटकंती हा विषय जवळजवळ सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे.भटकंती,भ्रमण, सहल आवडत नसणारा माणूस शोधूंनाच काढावा लागेल.
  अलीकडील काही वर्षात रामलिंग हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले असून डोंगरी भाग,दर्‍या,कपार्‍या,माकडे,यासह जंगली पशू,पक्षी,प्राणी आदींच्या वास्तव्यामुळे या क्षेत्राला पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या व तरुण-तरुणीसह भावीकांच्या मनात घर केलेले रामलिंग हे चांगलेच नावारूपाला येऊ पहात आहे.
 युवक युवतिसह प्रेमी युगलांना पर्वणीच:रामलिंग हे घनदाट जंगलांनी वेढलेले असल्यामुळे श्रावण महिन्यात तर हे ठिकाण लहानापासून थोरमोठ्यापर्यंत एक पर्वणीच ठरत आहे.दूर दुरून अनेकजण मौज, मजा,विरंगुळा करण्यासाठी रामलिंग परिसरात येत असतात.परिसरातून वाहणार्‍या नद्या पशू पक्ष्यांचे मंजुळ आवाज माकडांचे सर्वदूर वास्तव्य ससे हरिनाच्या लक्षवेधी कळप आदि निसर्गरम्य वातावरणामुळे रामलिंग हे सर्वांनाच खुणावत आहे.
   हिरव्यागार डोंगरावर विविध जातीच्या औषधी वनस्पतीचे अछादन,खोलखोल दर्‍या,डोंगरातून वाहणारे स्वछ पाणी,हिरव्यागार निसर्ग सृस्टीचा सहवास,मनाला नवी चेतना देणारे जवळच असलेले गुरुकुल,डोंगराच्या मध्यावर असलेले रामलिंग हे सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील अनेक जिल्ह्यातील पर्यटकांना खुणाऊ लागले आहे.रामलिंग या क्षेत्राचा पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष केन्द्रित करून विकास करणे गरजेचे आहे.शेकडो किलोमीटर दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा अनुभव घेण्यासाठी आर्थिक हानी सहन करावी लागते.मात्र रामलिंग या ठिकाणी सफर मारल्यास मिनी महाबळेश्वरचा अनुभव घेता येतो.रामलिंग देवस्थानच्या परिसरात हजारो एकर क्षेत्रात वन खात्याचे विस्तीर्ण क्षेत्र असून त्यामुळे याचे वेगळेपण आणखीनच खुलून जात आहे.
पर्यटन विकास दुर्लक्षित मुद्दा:ईतर राज्य पर्यटनस्थळांचा विकास करून त्यातून मोठा आर्थिक फायदा करून घेत असताना मात्र आपल्या भागातील अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या विकासाकडे कोणी गंभीरतेने पाहताना दिसत नसल्याची जनतेची ओरड आहे.महाराष्ट्राला नेसर्गिक रचनेचा ठेवा मोठा असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबदल पर्यटकामधून खंत व्येकत केली जात आहे.
 
Top