बार्शी - उन्मेश सृजनरंगाचा या सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद यावर्षी बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाकडे आले आहे.
      डॉ.मामासाहेब जगदाळे सांस्कृतिक नगरीत दि.२१ ते २४ सप्टेंबर रोजी हा युवा महोत्सव होत असल्याची माहिती संस्थाध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रशांत नलावडे, हनुमंत मते, प्रभाकर कोळेकर, प्राचार्य मधुकर फरताडे, एस.एन.शिंदे, अबोली सुलाखे, डॉ.भारती रेवडकर आदी उपस्थित होते.
 
Top