उस्मानाबाद - उमरगा विधानसभा मतदार संघात 100 टक्के मतदान व्हावे, यासाठी  विविध उपक्रमाद्वारे मतदान जागृतीचे काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. मा.निवडणूक निरीक्षक (स्वीप-2) यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा-लोहारा  तालुक्यातील सर्व महसूली गावे -143, ग्रामपंचायती -124, महाविद्यालये 784, महसूली मंडळे-8, पंचायत समिती, नगरपालिका आणि शासनाचे विविध शासकीय कार्यालये, बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत मतदान जागृती करुन  उदिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ‍रविंद्र गुरव यांनी केले आहे.
    उमरगा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका  व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गावरुन मतदान जागृती अभियानांतर्गत फेरी  काढण्यात आली. यावेळी न.प.मुख्याधिकारी डॉ.संतोष टेंगळे, राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रमधिकारी डॉ.एस.पी.इंगळे, एनसीसीचे प्रा.डी.एस.चित्तमपल्ले, शैलेश महामुनी, ‍     सुजित ‍शिंदे, राजू सुर्यवंशी, प्रा.एस.इ.बिराजदार यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक  व ‍शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रा.अस्वले यांनी मतदार जागृतीची शपथ दिली.
    घटनेने दिलेल्या  मतदानाच्या  अधिकाराचा वापर  उमरगा व लोहारा  या  तालुक्यात मतदारांना होण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात  आला असून त्यानुसार  उपविभागीय कार्यालय अणि उमरगा तहसील कार्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय उमरगा, भारत वि द्यालय, उमरगा, विद्या विकास विद्यालय दाळींब ता. उमरगा, नगरपालिका, मुरुम, ता. उमरगा, तहसील कार्यालय, लोहारा, जिल्हा परिषद, शाळा हिप्परगा (रवी), मार्डी, विद्या विकास हायस्कूल, अचलेर, माकणी, सास्तूर, भातांगळी, कासार आष्टा ता.लोहारा येथे जनजागृतीचे कार्यक्रमही घेण्यात आल्याचे यावेळी डॉ. ‍रविंद्र गुरव यांनी  सांगितले.
 
Top