उस्मानाबाद- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुकीसाठी  पाचव्या  दिवशी  95 अर्जांची विक्री झाली. तर आज उमरगा विधानसभा मतदारसंघात सहा, परंडा मतदारसंघात पाच  तर उस्मानाबाद मतदार संघात सात उमेदवारांनी नाम निर्देशनपत्र दाखल केले आहेत.  
   उमरगा मतदारसंघात 8 जणांनी 13 अर्ज, तुळजापूर मतदारसंघात 17 जणांनी 52 अर्ज, उस्मानाबाद मतदारसंघात 11 जणांनी  20 अर्ज आणि परंडा मतदारसंघात 6 जणांनी 10 अर्ज घेतल्याचे संबंधित निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.
    उमरगा विधानसभा मतदार संघात चौघुले ज्ञानराज धोंडीराम(शिवसेना), व्हटकर विलास शरणाप्पा, गायकवाड उमाजी पांडूरंग, राजू उर्फ राजेंद्र बळीराम उबाळे, सरवदे रावसाहेब श्रीरंग, ‍जितेंद्र  उर्फ ‍जितेश लक्ष्मण चौघुले या अपक्षांनी तर उस्मानाबाद येथे तुपसुंदरे बालाजी बापूराव, गाढवे केरबा, रामजीवन  पंढरी बोंदर, हे अपक्ष तर राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी), अनंत जगन्नाथ चौंदे ( भारतीय शेतकरी कामगार पक्ष)  तर जाधव  भीमा शंकर यांनी एक अपक्ष व भारतीय जनता पार्टी यांच्याकडून नामनिर्देशनपत्र, परंडा मतदार संघात पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब (शिवसेना), मोटे राहूल महारुद्र (राष्ट्रवादी), बाळासाहेब भगवंतराव पाटील, अमेय बाळासाहेब पाटील दोन्ही राष्ट्रीय समाज पक्ष  आणि हावरे अब्दूल करीम म. युसुफ यांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र दाखल केले
 
Top