वैराग (महेश पन्‍हाळे ) शासनाच्या वतीने मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे .या मोहिमेला हातभार म्हणून वैराग च्या ओम महा ई सेवा केंद्रामार्फत राबवण्यात येणाया जातीच्या प्रतिज्ञापत्रावर मतदान जागृतीचा संदेश देवून अभिनव उपक्रम राबिवला जात आहे
    बार्शी मतदार संघातचं नव्हे  तर सगळीकडे लोकसभा असो वा  विधानसभा मतदानाची टक्केवारी हि ५० ते ६० टक्के पर्यंतच असते त्यामुळे मतदारांचे मतदानाकडे होत चाललेले दुर्लक्ष लक्षात घेऊन शासनाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरे केले आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम वैरागच्या ओम महा ई सेवा केंद्र करत आहे. याआधी लोकसभेलाही त्यांनी अशाच प्रकारचा उपक्रम राबिवला होता. आता यावेळेस    जातीच्या प्रतिज्ञापत्रावरच त्यांनी
“लोकशाहीची मुल्ये जपण्यासाठी निर्भिड आणि निर्भयपणे मतदान करा..” 
 “ मताला किंमत नाही घेणार/ मतदान मात्र जरूर करणार .”
“ मतदानाचा हक्क बजावा ”
असे संदेश देणारे बोध वाक्य टाकली असून आता चालू असलेल्या मतदार याद्यात युवक मतदारांची संख्या जास्त असल्याने लक्षात घेऊन ते युवक जेव्हा जातीचे दाखले काढण्यासाठी महा ई सेवा केंद्राकडे येतात तेव्हा प्रतिज्ञापत्राचा फॉर्म भरत असताना त्यांचे मतदान जागृती साठी टाकलेल्या बोध वाक्याकडे लक्ष वेधत आहे व त्यांच्या  मनात मतदान करण्याची उत्सुकता निर्माण होत आहे यामुळे  लोकशाही बळकट होण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
    सदरच्या उपक्रमाचे बार्शीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी , निवासी नायब तहसीलदार उत्तम पवार , यांनी कौतुक  केले असून अशा प्रकारचे उपक्रम सर्वांनी राबवण्याचे आवाहन त्यांच्या कडून होत आहे.
 
Top