उस्मानाबाद - विधानसभा निवडणूक-2014 मध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि शासनाच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न करण्यात येतच आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वीप कार्यक्रम राबविला जात आहे. शनिवारी येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची तसेच इतरांमध्ये त्याबाबतची जनजागृती करण्याची शपथ घेतली.
    मतदनाचा लोकशाहीने मार्गाने दिलेला अधिकार प्रत्येकाना बजावावा यासासाठी मतदारात जनजागृती होणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांनी मतदान जागृतीसाठी उपक्रमाची व्यापकता वाढणे आवश्यक   असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शेतकरी गटस्थापनासंदर्भात आढावा बैठक कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची केले.
    जिल्हाधिकारी डॉ.     नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थित अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी सर्व  अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून प्राप्त शपथपत्राचे वाचन करुन सर्वांना मतदान करण्या विषयी शपथ दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता  झाली.    
 
Top