तुळजापूर :- तुळजापूर विधानसभा मतदार संघातील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जीवनराव गोरे यांच्‍या प्रचारार्थ तुळजापूर येथे उद्या रविवार दि. 5 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राष्‍ट्रवादीचे अनेक मान्‍यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
    तुळजापूर येथील हाडको मैदानावर सदर सभा होणार आहे. या सभेसाठी उपस्थित राहण्‍याचे आवाहन राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिका-यांच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

 
Top