पांगरी :- नादुरुस्त झालेला ट्रान्स्फोर्मर दुरुस्त करत असलेल्या एका खाजगी वायरमनचा वीज प्रवाह सुरू झाल्यामुळे मृत्यू  झाल्याची तर दोघांचा या घटनेत जीव वाचल्याची घटना  गुरुवारी कारी ता.बार्शी शिवारात घडली.राजेंद्र पांडुरंग बोधले वाया 35 रा.कारी असे जागेवरच चिटकुन मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नांव आसून दोघांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
     संजय रघुनाथ विधाते रा.कारी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत राजेंद्र व गावातील इतर दोघे असे तिघेजण मिळून गावालागतचा नादुरुस्त असलेला डीपी दुरुस्त करण्याचे काम करत होते.काम करत असतानाच विजवाहक तारामध्ये अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यामुळे ट्रानस्फोर्मर दुरुस्थीचे काम करत असलेल्या राजेंद्र बोधले यांना विजेचा धक्का लागून ते खांबावरच चिटकुन बसून मयत झाले.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top