बार्शी -:  २६/११ मुंबई वर झालेल्या अंतकवादी हल्ला रोखताना झालेल्या शहीद जवानाना तसेच यामधअये बळी गेलेल्या निरापराध लोकांना येथील रोटरॅक्ट क्लब बार्शी व बार्शी युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यामाने  शहीद रॅली व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बार्शीकर व तसेच तरुणांनी मोठा प्रतीसाद दिला. तसेच १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.
    मुंबई दहशतवादी हल्ला आज ६ वर्षे पूर्ण झाली. या हल्यात शहीद जवान हेमंत करकरे,अशोक कामटे,विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे व राहूल शिंदे हे जवान शहीद झाले होते. तसेच यामध्ये शकडो निरापराध नागरिकांचा बळी गेला होता. आज रोटरॅक्ट क्लब बार्शी व बार्शी युथ क्लब व्यर्थ हो ना बलिदान या कार्यक्रमा अतर्ंगत येथील जवाहर हॉस्पीटल शहीद रॅली चे आयोजन केले होते. याचे ज्योत प्रज्वलन पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांच्या हस्ते करुन रॅलीची सुरुवात झाली. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौतम कांकरीया ,जीवन ज्योत संघटनेटे अध्यक्ष अजित कुंकूलोळ, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष आनंद बेदमुथ्था व बार्शी युथ क्लबचे अध्यक्ष मयुर मैंदरकर, डॉ.मनोज लोंखडे,डॉ.रामचंद्र जगताप,डॉ.तांबारे,अमर काळे,उदय पोतदार विजय गुंदेचा, संदीप सुराणा, प्रा.मधुकर डोईफोडे  या सह मोठ्या संखने नागरिक उपस्थित होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने अमर रहे अमर रहे शहीद जवान या घोषणा देत होती. यानंतर येथील श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी मध्ये शहीद जवांनाना श्रध्दांजली म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन रोटरी चे अध्यक्ष गौतम कांकरीया यांच्या हस्ते शिबीराचे सुरुवात करण्यात आली. या वेळी मोठी संखेने तरुण वर्ग उपस्थित होते. या शिबीरामध्ये १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन उस्फुर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख अनुप बकाल,प्रितम सुरवसे,प्रशांत गुळवे,स्वप्नील हागरे, सचिन नलावडे, स्वप्नील नेवाळे ,अमित माने, आदि नी परिश्रम घेतले.
 
Top