पांगरी -:  साखर उद्योग टिकवण्यासाठी ऊस उत्पादक टिकणे गरजेचे असून ऊस दरावर लवकरच तोडगा निघेल असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले. ते खामगाव ता.बार्शी येथे कुमुदा-आर्यन साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमुदा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश भोसले होते.दिलीप सोपल यांचा सत्कार कुमुदा उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश भोसले व व्हा.चेअरमन श्रीकांत नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी आर्यन शुगरचे चेअरमन योगेश सोपल,व्हा.चेअरमन श्रीकांत नलावडे,विजयसिंह महाडीक,प्रकाश पाटील,सुनील (बाप्पा) मोरे,प्रतापसिंह महाडीक,तुळजापूर देवस्थान प्रमुख सचिन पाटील,कैलास सावंत,बाजार समितीचे व्हा.चेअरमन कुंडलिक गायकवाड,माजी सभापति युवराज काटे,नंदकुमार काशीद,जि.प.सदस्य मकरंद निंबाळकर,विकास जाधव,कारखान्याचे जनरल म्यानेजर के.डी.पाटील,कार्यकारी संचालक एस.आर.धाबेकर आदी मान्यवर हजर होते.
    आ. सोपल पुढे बोलतांना म्हणाले की कारखान्यासमोर कमी दिवसात जास्त गाळप गाळप करण्याचे मोठे आव्हान असून ते आव्हान कर्मचारी व वयवस्थापक हे लीलया पार पाडतील.यापूवीच्या शासनाणे उसासंदर्भात वेळोवेळी योग्य निर्णय घेऊन साखर कारखाने टिकवण्यासाठी अनुदान दिले.
    कुमुदा उद्योग समूहाचे डॉ.अविनाश भोसले यांनी यावेळी कामगाराचे कौतुक करून पाच लाख मेट्रिक टन उसाचे गालाप करून कारखाण्याची कार्यक्षमता सिद्ध करून दाखवावे व सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले.
  इतर कारखान्यांच्या तुलनेतच या कारखान्याकडून शेतकर्‍यांना दर देण्यात येईल असे आश्वासन कुमुदाचे व्हा.चेअरमन श्रीकांत नलावडे यांनी उपस्थित शेतकर्‍यांणा दिले.
   विजयसिंह महाडीक यांनी प्रास्ताविकात कुमुदा उद्योग समूहाची माहिती देऊन कुमुदा-आर्यन साखर कारखान्यामुळे परिसरातील 10 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगून कारखान्याच्या 21 गट कार्यांलयाच्या माध्यमातून आठ हजार 300 हेक्टर ऊसाच्या नोंदी घेतल्याची बाब कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भविष्यात कुमुदा समूहातर्फे शेतकर्‍याना ठिबक सिंचन देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आभार के.डी.पाटील यांनी तर सूत्रसंचालन रोहित शिंदे यांनी केले.
 
Top