सोलापूर -  महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत लाभान्वीत क्षेत्राकरीता कृषी व्यावसायिकतेवर आधारित कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता शेतकरी, उत्पादक गट अथवा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून प्रकल्प मागविण्यात येत आहेत.
प्रामुख्याने काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळे विषयक प्रकल्प, मुल्यवर्धन, प्रक्रिया, प्रतवारी व पणनविषयक प्रकल्प, कृषी मुल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरण विषयक प्रकल्प, शेतकरी गट- संघ, कृषी अवजारे सामुहिक भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय, बाजाराभिमुख सेंद्रीय कृषी उत्पादकता, त्यांची प्रतवारी त्याचबरोबर शेळी, मेंढी यासारखे पशुसंवर्धन प्रकल्प आदीचा यामध्ये समावेश आहे.
इच्छुकांनी आपला प्रकल्प प्रस्ताव प्रकल्प संचालक, आत्मा, नवीन आरटीओ ऑफिसच्या पाठीमागे, मृदु चाचणी प्रयोगशाळा शेजारी, विजापुर रोड,  सोलापूर, (दु.क्र. 0217-2303027) याठिकाणी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावा. प्रकल्प निवडीच्या अटी व शर्ती www.macp.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्‍छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक ( आत्मा) यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
 
Top