बार्शी - भारतमाता व जन्मदात्री आई ही प्रेरणा आहे. निष्पाप लहान बालकांना चांगले संस्कार शिकवणे, वाईट गोष्टीपासून दूर ठेवणे ही स्त्रीयांची प्रमुख जबाबदारी आहे. आपाण जसे घडवतो, संस्कार करतो त्या पध्दतीनेच लहान मुले घडतात. प्रत्येक मुलगी एक आदर्श महिला व आदर्श माता बनावी. आधुनिकतेच्या प्रभावाने आजकालची आजी नातवंडाकडून एबीसीडी शिकते परंतू आजीनेही संस्
              प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाद्वारे राजस्थानमधील आबुरोड येथील शांतिवन येथे ‘नारीमधील दैवी शक्तिद्वारे महापरिवर्तनासाठी ईश्‍वरीय शक्ती ’या विषयावर दिनाक १२ ते १६ डिसेंबर रोजी महिला संमेलन झाले. १३ रोजी झालेल्या ‘आध्यात्मिकता व आधुनिकतेच्या संतुलनाद्वारे महापरिवर्तन’या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
      संमेलनाचे उदघाटन दादी रतनमोहीनीजी यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उद्योग प्रभागाच्या मुख्यालय संयोजिका ब्रहमाकुमारी गीताबहनजी होत्या.
कृत मंत्रपठण, प्रार्थना शिकवून आध्यात्मिकतेचे संस्कार करावे. महिलांनी आधुनिकता व आध्यात्मिकता यांना बरोबर ठेवल्यास नवीन पिढीला चांगले संस्कार देता येतील असे प्रतिपादन बार्शीच्या ऍड.सौ.प्रणाली शेटे यांनी केले.
 
Top