बार्शी -  प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये स्वतंत्र महिला कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बार्शीसाठी स्वतंत्र महिला अधिकारी व स्वतंत्र वाहनाची सोय करण्यात आली आहे. युवती व महिलांनी आता निर्भिड रहा. अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधा असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी केले.
    बार्शी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या युवती सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. सोमवारी शिवशक्ती मैदान येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलिस अधिक्षक सर्जेराव ठोंबरे, पोलिस निरीक्षक सालार चाऊस, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ.बी.वाय.यादव, प्राचाय मधुकर फरताडे, उपविभागीय पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, डॉ.भारती रेवडकर, राखीव दल, शिघ्र कृतीदल, दंगा काबू इ. विविध पथकातील महिला कर्मचारी उपस्थित होते.   
    मंडलीक म्हणाले, दिल्लीच्या प्रकरणानंतर कायद्यात अनेक महत्वाचे बदल झाल्याने कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. ३०९० या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा, वृध्दांसाठी १०३ तर सर्वांसाठी १०० या क्रमांकावर आपली अडचण कथन केल्यास आपल्याला मदत मिळू शकते. काळाच्या ओघात समाजात विविध प्रकारचे बदल होत आहेत कधीकधी ते प्रकर्षाने जाणवतात. मुलींच्या बाबत पालकांच्या मनामध्ये नेहमी एक प्रकारची भिती दिसून येते. समाजात ५० टक्के महिला आहेत, पोलिस विभगातही आता महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती ३० टक्केंपर्यंत होत आहे. कोणत्याही अनुचित घटना घडत असतांना त्यावेळी नेमके काय करायचे?, नेमके कोण आपल्याला मदत करणार?, कोणत्या परिस्थितीत काय करायला हवे?, कायद्याने आपल्याला कोणते अधिकार प्राप्त झाले आहेत व आपल्याला त्याचा आधार आहे?, अशा विविध प्रश्‍नांनी पालक व संबंधीत गोंधळून जातात. या सारख्या प्रश्‍नांसाठी पोलिस ठाण्यातही महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. युवती व महिलांसाठी कायदा सुव्यवस्थेचा कोणता प्रश्‍न निर्माण झाला असेल तर त्यासाठी चांगली मदत मिळणार आहे. युवती व महिलांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास निर्माण व्हावे यासाठी पोलिस तुम्हाला मदत करतील. शहरी भागातील व ग्रामीण भागातील शालेय शिक्षण घेत असलेल्या मुली, महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या युवती, नोकरीनिमित्त व इतर कारणास्तव घराबाहेर पडणार्‍या महिलांना, विविध वाहनांतून प्रवास करतांना व विविध परिसरात, काही धोका वाटल्यास मदतीसाठी संपर्क करावा. मुलींच्या काही तक्रारी पालकांना समजल्यावर त्यांचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला जातो, अशा प्रकारच्या निर्णयाने चांगली बुध्दीमत्ता असलेल्या मुलींचेही करिअर बरबाद होते. यासाठी शासनाने चांगल्या प्रकारची सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयीन परिसर विविध गर्दिचे ठिकाण इत्यादी ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलिस सर्वत्र पाळत ठेवतील. संशयास्पद हालचाली अथवा उनाड मुलांचा बंदोबस्त करतील. वाहनाची मदत घेतांना कोणाकडून मदत घ्याल याचा विचार करावा. पालकांनी आपल्या मुलींना कुठे कसे वागावे या प्रत्येक गोष्टीचे बारकावे शिकविले पाहिजे. उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा दुबुले म्हणाल्या, महिलांसाठी व युवतींसाठी सुरक्षा जनजागृती हा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आहे. मंडलिक साहेबांसारखे धडाडीचे अधिकारी जनतेत मिसळून सेवा देण्याची कार्यप्रणाली राबवित आहेत. शासनाची भूमिका व अधिकार्‍यांची तळमळ या ठिकाणी दिसून येते. घरात सुरक्षा बाहेर समस्या असा न्यूनगंड नको. युवतींमध्ये धाडस निर्माण व्हावे, पुढे येऊन निर्भिड बनावे, आत्मविश्वास निर्माण होऊन व्यक्तीमत्व विकास करावा, पुढे जात चांगल्या अधिकारी पदावर देखिल काम करावे. चांगले शिक्षण घ्यावे, चांगले नेतृत्व करावे, चांगले बौध्दीक कौशल्य असतांनाही महिलांना काही अडचणी येत असतील तर त्यातून मार्ग निघावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माझ्या जिल्ह्यातील युवती, महिला इत्यादी सुरक्षीत असायला पाहिजे त्यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास निर्माण व्हावा अशी पोलिस अधिकारी यांची इच्छा आहे.   
    प्राचार्य मधुकर फरताडे म्हणाले, मी देखिल तसा पोलिसच आहे. मकाविद्यालयीन कामकाजात मुलांना शिस्त पाळण्यास सांगत असतांना पोलिस असल्यासारखेच काम करावे लागते. (यावर झिरो पोलिस असा खालून आवाज आला त्यावर त्यांनी झालेल्या विनोदावर सर्वांना हसवले.) जवळपास लाख लोकांसाठी एक पोलिस अधिकारी उपलब्ध होतो. रक्षण करण्याचे काम केवळ पोलिसांचेचे आहे हे मनातून काढायला हवे, अनेक जण आपल्या हक्काकडे जागरुकतेने पाहतात पण त्यांना कर्तव्याचा विसर पडतो. कायदा सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आजकाल घडणार्‍या अनेक घटनांतून युवती व मुली या घरात देखिल सुरक्षीत नसल्याचे दिसून येत आहे यावर विचार करायला हवा. युवतींनीही आपली मर्यादा ओळखायला हवी. कोणी खोड्या करत असेल तर ते वेळीच सांगावे, माझ्याकडे बघून मुलगी हसली म्हणून अनेक जण त्यामध्ये गुंतून जातात व टोकाचे प्रकार घडतात तर कधीकधी एकतर्फी प्रेमाचे प्रकार घडतात. मुलींनी आपल्या एका हसण्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल याचे भान राखायला हवे. आपले वागणे, चालणे, बोलणे यावरुन समोरच्या व्यक्तीचे विचार व नजरा अवलंबून असतात. सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बँड पथकाने स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ.जगदाळे मामा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागाने स्वागत गीत गायले. अश्विनी गवळी व वंदना गायकवाड यांनी सूत्र संचलन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप अलाट, उमेश पवार व पोलिस विभागाच्या कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.
ठळक
सावित्रीबाई फुलेंचा विसर (केवळ छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.जगदाळे यांच्या प्रतिकेचे पूजन
व्यासपीठावरी महिला पोलिस कर्मचारी चक्कर येऊन पडली (पोलिस पथकातील कर्मचारी अनेक वेळ उभी राहिल्याने औषधोपचारासाठी खाली घेण्यात आले.)
अनेक लहान मुलींना परत पाठविले (अनेक शाळा व महाविद्यालयांना मुलींच्या मार्ग
अनेक मुलींना उन्हात बसावे लागले (मुलींची संख्या नेमकी किती होईल, किती जागा लागेल याचा अंदाज न आल्याने उपलब्ध केलेल्या मंडपाबाहेरही मुलींना उन्हात बसावे लागले.)
 मनिषा दुबुले म्हणाल्या - माझ्या जिल्ह्यात महिला सुरक्षीत हव्यात
पोलिस अधीक्षक म्हणाले - बार्शीसाठी महिला पोलिस अधिकार्‍याची नियुक्ती,
बार्शीकरिता महिला पोलिस पथकांचे स्वतंत्र वाहन उपलब्ध करु.
प्राचार्य फरताडे म्हणाले - मी देखील तसा पोलिसच आहे, मुली घरात सुध्दा सुरक्षीत नाहीत.
दर्शनासाठी पोलिसांकडून बोलाविण्यात आले होते. अनेक मुली कार्यक्रम स्थळी चालत आल्यावर त्यातील इ.८ वी. च्या खालील विद्यार्थीनींना परत पाठविण्यात आले.)
 
Top