पांगरी - राज्यातील संगणक शिक्षकांवर सूडबुद्धीने कारवाई होऊ न देता येत्या जानेवारीत संगणक शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर समिती स्थापन करून सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन महाराष्ट्रचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले असल्याची माहिती राज्य श्रमिक महासंघाला दिले.राज्यातील हजारो संगणक शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढला होता.राज्यात केंद्र शाशन पुरस्कृत आयसीटी योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षकांना पद निर्मिती करून सेवेत कायम सामावून घेऊन दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंगाच्या वतीने नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढून हा प्रश्न लावून धरण्यात आला होता.तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत शिस्टमंडळातील कॉ.शरद संसारे,उदय भट,आयसी