पांगरी - पांगरी ता.बार्शी येथील रंगनाथ जानराव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(आठवले गट)सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.रिपाईचे जिल्हा अध्यक्ष अशोक सरवदे,व राष्ट्रीय सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते जानराव यांना निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले.निवडी
वेळी जितेंद्र बनसोडे,बाळासाहेब कसबे,अर्जुन मागाडे,कैलास कांबळे,दत्ता वाघमारे,संतोष पवार,संतोष सर्वगोड,दीपक चंदनशीवे,पप्पू बाबर,आप्पा जाधव,लक्ष्मण कांबळे,कुमार ढवळे यांच्यासह  जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  रंगनाथ जानराव यांनी यापूर्वी जिल्हा संघटक म्हणून दहा वर्ष,विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून दहा वर्ष काम पाहिले आहे.निवडीबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
 
Top