पांगरी (गणेश गोडसे) बार्शी तालुका पंचायत समिति व नागनाथ हायस्कूल घारी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या बार्शी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घारी येथीलच नागनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
   प्राथमिक विभागातून घारी येथील शिवरूद्र शांतिलिंग घोंगडे याने तयार केलेल्या बटाट्यापासुन वीजनिर्मिती या प्रयोग कृतींस प्रथम क्रमांक मिळाला.तर शिक्षक विभागातून माध्यमिक गटात महेश महादेव मेटकरी (विज्ञान शिक्षक) यांनी लोकसंख्या शिक्षण या विषयांतर्गत यश मिळवले.या विज्ञान प्रदर्शनात नागनाथ हायस्कूलच्या अठरा विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे बार्शी शिक्षण मंडळाच्या चेअरमन प्रभावती झाडबुके,संचालिका सौ.वर्षाताई ठोंबरे,शाळा समितीचे चेअरमन गुलाबराव ठोंबरे,प्रशाळेचे मुख्याध्यापक केशव काकडे आदिकडून अभिनंदन होत आहे.
 
Top