पांगरी (गणेश गोडसे) जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्‍यांची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगति की अधोगती सुरू आहे याचा विचार करून ढेपाळत चाललेया शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकर्‍यासाठी कृषि व्याख्याने,या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सत्कार,कृषि प्रदर्शन,मेळावे आदि उपक्रम राबवणे गरजेचे आहे.देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता.तो आज 22 ते 25 टक्याच्या आसपास आला आहे.
  आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते.मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी,शेतीमालच्या दरवाढीसाठी,शेतकर्‍याची आर्थिक,सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे.देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत असताना देशभरातील शेतकरी राजाची सध्याची स्थिति,त्यांचा आर्थिक स्तर,सामाजिक पत,त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक आदि बाबीचा विचार करणे यानिमित्ताने गरजेचे आहे.पोळ्याच्या सणादिवशी जसे बैलाला नटवून सजवून त्याला गोड धोड खाऊ घातले जाते व पुन्हा वर्षभर त्याच्याकडून काबाड कष्ट करून घेतले जाते तसे शेतकर्‍यांच्या बाबातीतही घडत आहे.कृषिप्रधान देश,जगाचा पोशिंदा,शेतकरी राजा,देशाच्या विकासाचा कणा,अशी भूषणावह मुकुट शेतकर्‍यांच्या शिरावर घातले जातात.मात्र त्यांच्यासह शेतीच्या विकासासाठी ठोस आशे काहीच होत नसल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे.रक्ताचे पाणी करून आम्ही देशवाशीय जगावण्यासाठी झिजायचे,मात्र आमच्या कष्टाची कोणाचं करताना दिसत नाही अशी त्यांची ओरड आहे॰सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परस्थिती मात्र जैसे थे अश्याच स्वरूपाची राहिली.शेतकर्‍यांना वालीच उरला नाही अशी स्थिति सध्या निर्माण झाली आहे.
  यानिमिताने शेतकर्‍याची आर्थिक ऊंची वाढवण्यासाठी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल सुचवणे,ते अमलात आणण्यासाठी त्यांना तयार करने व विशेष म्हणजे शेतकरी सद्य स्थितीत भेदरलेल्या व कर्जबाजारी अवस्थेत असल्यामुळे त्याला उभे करण्यासाठी अर्थ पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शेतकरी उभा राहिला तरच देश प्रगतिची शिखरे पार करू शजेल अन्यथा विकासाच्या फक्त वल्गनाच ठरू शकतात.शेतकर्यांना व्यवसाय पूरक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यापारी बनवल्यास ते प्रगति करू शकतात.तेव्हाच शेतीमा
  शेतकरी आत्महत्या विचार होणे गरजेचे: सध्या वेगवेगळ्या कारणावरून शेतकरी आपले जीवन संपवत आहेत.शाशन याकडे पाहण्यापलीकडे व शेतकर्‍यांणी आत्महत्या करू नये असे माध्यमातून सांगण्यापलीकडे वेगळे काहीच करत नाही.आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला सहानुभूतू दाखवत शाशनाच्या धनादेशाचे वाटप करून मोकळे होत आहे.महाराष्ट्रातील उगवणारा प्रत्येक दिवसा हा एका नवीन आत्महत्येच्या वार्तेनेच उगवताना दिसत आहे.आत्महत्येच्या घटनेत देशात अव्वल स्थानी आलेल्या महाराष्ट्रातील कर्जाने पिचलेल्या शेतकर्‍याला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत. त्याने आत्महत्या का केली त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मात्र होत नाही ही दुर्दैवाची बाबा आहे.
लाला भाव मिळू शकतो.
 
Top