उस्मानाबाद -  प्रायोगीक तत्वावर हवामानावर आधारीत पथदर्शक फळपीक विमा योजना उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळासाठी लागू  करण्यात आली आहे. सन 2014-15 या हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार आंबा उत्पादक शेतक-यांनी आंबा या पिक विम्याचा प्रस्ताव बॅंकेत  31 डिसेंबरपर्यत  सादर करुन आंबा पिक संरक्षित करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.                 आंबा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी  प्रतीहेक्टरी 4 हजार 932 इतकी रक्कम बँकेत  भरुन या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सबंधित उपविभागीय अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/ राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
 
Top