पांगरी (गणेश गोडसे) : एकाच रात्रीत गावात विविध ठिकाणी दुकान,घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह रोकड रक्कम चोरून नेल्याची घटना गोरमाळे ता.बार्शी येथे घडली. अरुण मारुती जगताप व नवनाथ कसपटे अशी चो-या झालेल्या शेतकर्‍यांची  नांवे  आहेत.पांगरी पोलिस ठाणे हद्दीत थाबलेले चोर्‍याचे सत्र पुन्हा सुरू झाल्यामुळे जनतेमधून भीतीचे वातावरण पसरले असून रात्र गस्त सुरू करण्याची मागणी गोरमाळे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
   अरुण जगताप यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते रात्री जेवण करून शटरला कुलूप लावून झोपले असता अज्ञात चोर्‍टयांनी  कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कोपर्‍यात असलेल्या लोखंडी पेटीत असलेले एक तोळे सोने,पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या दोन ग्रॅम वजनाचे  पदक,दोन कर्णफुले,एक बोरमाळ,अकरा साड्या व पैसे असा ऐवज चोरून नेला.फिर्‍यादीचे वडील पहाटे लघुशंखेसाठी उठल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.
  दुसर्‍या घटनेत गावातीलच नवनाथ कसपटे यांच्या घराची खिडकी तोडून आत प्रवेश करून घरातील तेलाचा डब्बा,प्रेशर कुकर आदि ऐवज चोरट्यांनी लबाडीने चोरून नेला आहे.अरुण जगताप यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्‍यादिवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार शेटे हे करत आहेत॰
 
Top