पांगरी (गणेश गोडसे)  महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या एका युवतीने  अज्ञात  कारणावरून रहात्या घरी स्वत: गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पाथरी ता.बार्शी येथे घडली.पूनम अंकुश करडे (रा.पाथरी वय 17) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नांव आहे.
 संगिता अंकुश करडे वय 35 या मुलीच्या आईने या घटनेची खबर पांगरी पोलिसात दिली आहे.मयत पूनम ही चारे येथील कर्मवीर उच्च माध्यमिक महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती.आज दुपारी 12.30 वाजता घरी आल्यानंतर आईने जेवण करून घे असे सांगून ती घराबाहेर गेली असता दरम्यानच्या काळात पूनम हिने राहत्या घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.संगिता करडे यांनी दिलेल्या खबरीवरून पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.

 
Top