जळकोट (संजय रेणुके) जागतिक पातळीवर विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. मग जगातील कोणत्‍याही प्रयोग शाळेत कृत्रिमरित्‍या मानवी रक्‍त तयार करण्‍यात दुर्दैवाने आद्याप यश आले नाही. त्‍यामुळे रूग्‍णाचे प्राण वाचवण्‍यासाठी मानवाच्‍या शरीरातील रक्‍ताशिवाय पर्याय ना
ही.  त्‍यासाठी सर्वच ठिकाणी रक्‍तदान शिबीर आयोजित करून रक्‍त संकलित केले जाते. याचाच एक भाग म्हणून भविष्‍यात मानवी रूग्‍णांना रक्‍त कमी पडू नये हा उदात्‍त हेतूने जळकोट ता. तुळजापूर  येथील शिवरत्‍न बहुउद्देशिय सामाजिक सेवाभावी संस्‍था संचलित सार्वजनिक शिवजन्‍मोत्‍सव समिती तर्फे शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी रोजी आयोजित रक्‍तदान शिबीरात एकशे अकरा युवकांनी रक्‍तदान केले.
    शिवजन्‍मोत्‍सव समितीच्‍या पदाधिका-यांनी आयोजित केलेल्‍या रक्‍तदानाचे हे आठवे वे वर्ष असून प्रत्‍येक वर्षी  रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान करून रूग्‍णांचे प्राण वाचविण्‍याचे सत्‍कर्म आजपर्यंत केले आहे. व यापुढेही अविरत करतच राहणार आहोत असा निर्धारही यावेळी समितीचे पदाधिका-यासह युवकांनी केला आहे.प्रारंभी शिवाजी चौकातील अश्‍वारूढ शिवरायांच्‍या पुतळयाचे पुजन प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वि‍वेक कुलकर्णी व संजिवनी कुलकर्णी, डॉ. संजय कदम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.  तर रक्‍तदान शिबीराचे उदघाटन नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डांगे यांनी केले. याप्रसंगी शिवजन्‍मोत्‍सव समितीचे अधारस्‍तंभ किशोर कदम, अध्‍यक्ष नागराज जाधव, उपाध्‍यक्ष आनंद मोटे, सचिव शाहुराज कदम, कोषाध्‍यक्ष नागराज कदम, सहसचिव मंगेश सुरवसे, खजिनदार विशाल जाधव, अॅड सचिन कदम, शिवराम कदम, उमेश गंगणे, ब्रम्‍हानंद कदम, शकिल मुलानी, विकास जाधव, दगडू सुरवसे, पवन जाधव, विकास चुंगे, रोहित कदम, जितेंद्र कदम, मनोज कदम, अमिरपाशा जमादार, आदीसह नागरिक उपस्थित होते. 
   सदर शिबीरात अरूण लोखंडे, संजय रेणुके, जीवन गुळे आदींसह एकुण एकशे अकरा युवकांनी रक्‍तदान केल्‍याने जन्‍मोत्‍सव समितीच्‍यावतीने त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करण्‍यात आले. रक्‍त संकलनासाठी गोपाबाई दमाणी, रक्‍तपेढी सोलापूर येथील श्रीमती. ए.ए थिटे, प्रकाश केसकर आदींनी योगदान दिले.

 
Top