उस्‍मानाबाद - महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍यावतीने शिवाजी चौक येथे जागतिक मराठी भाषा दिवस म्‍हणून फटाकेची अतिषबाजी व पुष्‍पगुच्‍छ, लाडू वाटप करून सदर 27 फेब्रुवारी रोजी उत्‍सहाने साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमास मनसे शहराध्‍यक्ष दादा कांबळे यांच्‍या नेतृत्‍वाखाली सदर जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्‍यात आला. 
   यावेळी मनसे शहराध्‍यक्ष दादा कांबळे, तालुका उपाध्‍यक्ष व्‍यंकट जाधव, नितीन राठोड, विठ्ठल गिरी, शिंगाडे रक्षित, संकेत गायकवाड, प्रेम बनसोडे, निहाल मुजावर, धावरे प्रतिक, अमोर सोयात धनेश मसने, संदीप आळगे आदी उपस्थित होते. 

 
Top