उस्‍मानाबाद - कामधेनु दत्‍तक ग्राम योजना पशुसंवर्धन विभाग, महाराष्‍ट्र शासन व जिल्‍हा परिषद उस्‍मानाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कामधेनु दत्‍तक ग्राम योजना जिल्‍ह्यातील 65 गावांमध्‍ये राबविण्‍यात येत आहे. 
   दत्‍तक गावामधील पशुंचे वंध्‍यत्‍व दूर करून त्‍यांची उत्‍पादन क्षमतेत वाढ करून दुग्‍धोत्‍पादक वाढविणे हा योजनेचा मुख्‍य उद्देश आहे. त्‍या दृष्‍टीने ही योजना  टप्यानूसार वर्षभर त्‍या गावामध्‍ये राबविले जाते. त्‍यामध्‍ये जनावरामधील जंतनिर्मुलन, गोचीड, गोमाशा निर्मुलन सर्व रोगाचे रोगप्रतिबंधक लसीकरण, वंध्‍यत्‍व निवारण निकृष्‍ट चारा सकस करणे, जनावरांच्‍या मलमुत्र व वाया गेलेल्‍या चा-यापासून खतनिर्मिती, प्रात्‍याक्षिक असलेला वनस्‍पतीचा जनावरांच्‍या खाद्यात उपयोग करणे, पशुपालन मंडळांना अधुनिक पध्‍दतीने पशुपालन करणे बाबत आभ्‍यास दौरा दत्‍तक गावामध्‍ये दुग्‍धस्‍पर्धा इत्‍यादी कार्यक्रम पशुपालन मंडळाच्‍या सल्‍याने राबविले जातात. त्‍याचाच भाग म्‍हणून या योजनांतर्गत पशुपालकांची आभ्‍यास दौरा उस्‍मानाबाद येथून फलटन ता. सातारा येथे दि. 27 फेब्रुवारी रोजी रवाना झाली. त्‍यांना पशुसंवर्धन व दुग्‍धशाळा समितीचे सदस्‍य रामदास कोळगे व पशुपालन विकास अधिकारी डॉ. सुभाष  बोरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सहल रवाना केली. 

 
Top