नळदुर्ग -  येथील नगरपालिकेच्‍या प्रभारी नगराध्‍यक्षपदाचा पदभार उपनगराध्‍यक्ष सौ. सुप्रिया पुराणिक यांनी घेतला असून नगराध्‍यक्ष सौ. मंगल सुरवसे यांनी नगराध्‍यक्षपदाचा पदभार पुराणिक यांना दिले. 
       नळदुर्ग नगरपालिकेच्‍या नगराध्‍यक्षा सौ. मंगल सुरवसे या रजेवर गेल्‍याने उपाध्‍यक्षा सुप्रिया पुराणिक यांनी प्रभारी नगराध्‍यक्ष पदाची सुत्रे स्‍वीकारली. याप्रसंगी पालिका सभागृहात  नगराध्‍यक्षा मंगल सुरवसे, शहर मनसे अध्‍यक्ष ज्‍योतिबा येडगे, शहर शिवसेना प्रमुख, संतोष पुदाले, माजी नगरसेवक सुधीर हजारी, नगरसेवक शब्‍बीर सावकार, संजय बताले, निरंजन राठोड, सचिन डुकरे, इमाम शेख, नगरसेविका अपर्णा बेडगे,  निर्मला गायकवाड, , कुरेशी, सुमन जाधव, लक्ष्‍मी खारवे, मुनवर सुलताना कुरेशी, सुप्रिया कुरेशी ,कॉंग्रेस सेवादलाचे अध्‍यक्ष विनायक अहंकारी, कॉंग्रेस जिल्‍हा सरचिणीस जावेद काझी, अख्‍तर काझी यांच्‍यासह नागरिक उपस्थित होते. 
    सुप्रिया पुराणिक यांनी प्रभारी नगराध्‍यक्षांचा पदभार घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या समर्थकांनी शहरात फटाक्‍यांची आतबाजी करून पेढे वाटले. त्‍यांचा शहरातील विविध संघटना व  कार्यकर्ते, पदाधिकारी सौ. सुप्रिया पुराणिक यांचा सत्‍कार करून त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. 
    यावेळी बोलताना नगरसेवक शहबाज काझी यांनी म्‍हटले की, शहरातील  पाणीपुरवठा तसेच स्‍वच्‍छतेचे पुरते धिंडवडे निघाले असून नगरपालिका  कर्मचा-यांवर  वचक राहिला नाही. जे कर्मचारी काम करित नाहीत त्‍यांना कारवाई करण्‍याचे सांगितले. यावेळी सत्‍काराला उत्‍तर देताना प्रभारी नगराध्‍यक्षा सुप्रिया पुराणिक यांनी म्‍हटले की, माझ्यासारख्‍या सर्वसामान्‍य महिलेला हे मनाचे पद आ. मधुकरराव चवहाण यांच्‍यामुळे मिळाले आहे. त्‍यांनी दाखविलेल्‍या विश्‍वासाला तडा न जावू देता मला मिळालेल्‍या या संधीचा उपयोग शहराचा विकास करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहिल. शेवटी सर्वांचे  आभार मुनीर शेख यांनी मानले. 

 
Top