बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  बार्शीत घरफोडी करुन सोन्याच्या दागीन्यासह रोख रक्कमेची चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना बार्शी पोलिसांनी अटक करुन मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयासमोर चोरट्यांना उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली.
सुनिल अंकुश गुरव वय २१, अतुल उर्फ हन्या राजाभाऊ चोबे वय १९ रा.मौजे धोत्रे असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. जगन्नाथ शामराव बदे वय ७१ रा.संभाजी नगर हे पुणे येथे नातेवाईकांकडे गेल्यावर त्यांच्या घरातून ३५ ग्रॅम सोन्याचे दागीने व ३ हजारांची रक्कम चोरी झाल्याची तक्रार ४ फेब्रुवारी रोजी बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सुनिल बनसोडे, पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरुन तपास केला. चोरट्यांकडून चोरीची कबुली झाल्यानंतर त्यांच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
Top