बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) काही ठिकाणी होत असलेल्या साहित्य संमेलनात एकीकडे कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसून येते. खैरावसारख्या अत्यंत दुर्लक्षीत, निर्जन आणि भौतिक सुविधांपासून कोसो दूर असलेल्या गावात मात्र उपलब्ध साधन, साहित्यांच्या जोरावर विना खर्चाचे परंतु साहित्यीकांना मनमुराद आणि मनसोक्त आनंद देणारे ग्रामीण साहित्य संमेलन सादर होते. मागील बारा वर्षांपासून या ठिकाणी ग्रामीण साहित्यीकांना व्यक्त होण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होते त्याची यावर्षी तपपूर्ती झाली आहे. साहित्यात जी भाषा समृध्द तीची संस्कृती तेवढीच समृध्द असते. साहित्य म्हणजे माणसाला व्यक्त होण्याचे साधन आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी चाळक यांनी केले.
खैराव (ता.माढा) येथील संत तुकडोजी महाराज साहित्य नगरी गुरूवर्य नागटिळक व्यासपीठावर आयोजित १२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलना निमित्त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विक्रांत पाटील, सामाजि कार्यकर्ते विक्रम सावळे, बार्शी शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष जीवन आरगडे, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष सुहास कांबळे, अतुल कोलते, चंद्रकांत गायकवाड, बालाजी डोईफोडे, गजेंद्र साखरे, कुबेर थिटे, महारूद्र जाधव, विजय बोराडे, प्राचार्य सुभाष नागटिळक, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
प्रारंभी संमेलनाचे उदघाटन डॉ.दीपक जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. श्री.चाळक म्हणाले, मराठी भाषेला २ हजार ३५० वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषा ही सर्वात समृध्द, समर्थ व संपन्न आहे. ग्रामीण साहित्य हे विशेषतः स्त्रीयांनी लोकगीत किंवा लोकभाषेव्दारे समृध्द केले. साहित्य संमेलनाच्या तपपूर्ती निमित्त संयोजक फुलचंद नागटिळक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उदघाटक डॉ.जगताप यांनी ग्रामीण भागात होणारे हे साहित्य संमेलन महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
संमेलना दरम्यान विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने स्त्री भ्रूण हत्या, लोकगीते, पोवाडे, गवळणी, लावणी, अफजल खानाचा वध हे ऐतिहासिक नाटक सावित्रीबाई फुले प्रशालेने सादर केला. कवि संमेलनात शंकर कसबे, विमल माळी, शशिकला गुंजाळ, बाळासाहेब जाधव, सचिन काळे, भारत कदम, नयना राजमाने, सविता धर्माधिकारी, मिनाक्षी वाघचौरे, प्रसाद मोहिते, संतोष चव्हाण, प्रा.विजयसिंह पाटील, चंद्रकांत नलावडे, महारूद्र जाधव, अमर बोराटे या कविंनी कविता सादर केल्या.
संमेलन यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष प्रताप नागटिळक, कार्याध्यक्ष गोविंदराव पाटील, विठ्ठल पाटील, संदीपान नागटिळक, अरूण साठे, प्रा.हनुमंत नागटिळक, प्रा.नारायण मगर, प्रा.धनाजी नागटिळक, महादेव शेळके, पोपट नागटिळक, चंद्रकांत नागटिळक, दिनकर नागटिळक, समाधान नागटिळक, विजयसिंह साठे, शंकर नागणे, संदीप मोटे, विजयसिंह पाटील, प्रवीण क्षीरसागर, सुनील घोडके, धनाजी नागटिळक, दिलीप नागटिळक, अच्युत नागटिळक, प्रवीण नागटिळक, शंकर नागटिळक, सचिन नागणे, रणजित रणपिसे, भीमराव क्षीरसागर, व खैराव ग्रामस्थ, नागनाथ यात्रा समिती यांनी परिश्रम घेतले. तर संमेलनाचे बोधचिन्ह महारूद्र जाधव यांनी तयार केले.
ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रा.वामन जाधव, आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव गोरे, आदर्श पत्रकार महादेव आवारे, पुरूषोत्तम बुधकी (खानापूर बेळगांव), आदर्श वैद्यकीय सेवा डॉ.दीपक जगताप, कवयत्री पुरस्कार प्रा.दर्शना देशमुख, सामाजिक संतोष चितळे, डॉ.कैलास गोरे, कृषी साहित्यिक चंद्रकांत नलावडे, सावित्रीबाई फुले सौ.जयश्री जयवंत नाईक, आदर्श ग्रंथालय राहूल सार्वजनिक वाचनालय, शिंदेवाडी ता.माढा, जीवन गौरव वसंत नागटिळक, मायमराठीचा वारसदार चारूदत्त साहित्य सेवा मंडळ कवठे महंकाळ यांना संयोजकांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 
Top