पांगरी (गणेश गोडसे)पांगरी ता.बार्शी पोलिसांनी विनापरवाना दारू विक्रेत्यांवर छापे टाकून त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीची देशी,विदेशी दारू जप्त केली.सोमनाथ नारायणकर (रा.पांगरी),व शिवाजी डोईफोडे (रा.कळंबवाडी)अशी विनापरवाना दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
 रविकांत चंद्रकांत लगदिवे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी सोमनाथ संभाजी नारायणकर हा इसम त्याच्या राहत्या घरच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाणा देशी,विदेशी दारू विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी अधिकार्‍यांसाह त्या पत्रा शेडमध्ये छापा टाकून तेथून 55 देशी दारूच्या,36 उमंग दारूच्या,18 मेकडोल,10 किंगफिशर,व अकरा ओफिसर्च चॉइस असा सात हजार पाचशे रुपयांचा माल तेथून हस्तगत केला.तेथील इसमाकडे दारू धंद्याबाबत चौकशी केली असता नारायणकर याचा असल्याचे सांगण्यात आले.ही कारवाई स.पो.नी.सोमनाथ वाघ,कोलेकर,नागरगोजे आदींनी केली.
  दुसर्‍या घटनेत पोलिसांनी कळंबवाडी हद्दीतील वास्तवार छापा टाकून विनापरवाना देशी दारूची विक्री करणार्‍या शिवाजी डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल केला.आरोपींनी आपल्या कब्जात विना परवाना,बिगरपास परमीटशीवाय देशी विदेशी दारू जवळ बाळगून विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कल्मानव्ये गुन्हा नोद करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार धन्नाप्पा शेटे,व सुधाकर ठाकर हे करत आहेत.

 
Top