पांगरी -  दुचाकीवर बसून आलेल्या महिलेस जंगलातील रस्त्याने घेऊन जावून तिचा विनयभंग केल्याची घटना काल दी.23 सोमवारी येरमाळा-पांगरी मार्गावरील येडेश्वरी साठवण तलाव मार्गावरील रस्त्यावर घडली.सचिन गोडसे वय 28 रा.पांगरी असे विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नांव आहे.
  याबाबत पिडीत महिलेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की उककडगाव येथे जाण्यासाठी येडेश्वरी मंदिरासमोर  उभी राहिली होती.दरम्यान त्या महिलेच्या ओळखीच्या इसमाने सादर महिलेस सचिन गोडसे याच्या दुचाकीवर बसवून तिस उककडगाव येथे सोडण्यास सांगितले.गाडी येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याला आल्यानंतर आरोपीने गाडी दुसर्‍याच रस्त्याने घालण्याचा प्रयत्न केला असता सादर महिलेने गाडी कुठे नेतोस असे विचारून दुचाकीवरून उडी मारली.नंतर आरोपीने तिच्या जवळ येऊन तिचे हात धरून तिच्याशी झोंबाझोंबी केली॰महिलेच्या फिर्‍यादिवरून सचिन गोडसे याच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यास अटक करण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड करत आहेत
 
Top