नळदुर्ग - येथिल प्राचीन श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्‍या नवीन मंदीर उभारणीच्‍या कामाचा शुभारंभ  गुरूवार दि. 26 फेब्रुवारी रोजी भूमीपूजन व शिलान्‍याससह विविध धार्मिक  कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमात जैन बांधवांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहावे, असे अवाहन श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्‍ट नळदुर्गचे उपाध्‍यक्ष तथा जैन युवक मंडळाचे सुधीर पाटील व उपाध्‍यक्ष प्रविण कासार यांनी केले आहे. 
      नळदुर्ग शहरातील  अतिप्राचीन श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर असून  या मंदिराची पडझड झाली होती. शहरातील जैन बांधवांनी या मंदिराचा जिर्णोध्‍दरीत नवीन मंदिर उभारण्‍याचा संकल्‍प केला त्‍याकरिता श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्‍टची  स्‍थापना केली. या ट्रस्‍टचे अध्‍यक्ष म्‍हणून श्रेणीक पाटील, उपाध्‍यक्ष सुधीर पाटील, प्रविण कासार यांची निवड करण्‍यात आली. शहरातील सर्व जैन बांधवाचे प्रयत्‍न व जैन समाजातील दानशूर व्‍यक्‍तींच्‍या सहकार्याने या नूतन मंदिराची उभारणी करण्‍यात येत आहे. परमपूज्‍य श्री 108 सयंम सागरजी महाराज यांच्‍या कृपा अशिर्वादाने या मंदिराची उभारणी होत आहे. या भव्‍य मंदिराचे भूमीपूजन शिलान्‍यासाचा कार्यक्रम गुरूवार दि. 26  फेब्रुवारी रोजी होणार असून  सकाळी 9 वाजता कलश शोभा यात्रा, 9:30 वाजता ध्‍वजारोहण, 10 :30 वाजता अभिषेक आणि महाशांती धारा, 11 वाजता नूतन श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे चित्र  आनावरण व दिप प्रज्‍वलनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 1 वाजता नवीन मंदिराच्‍या शिलान्‍यासाचा तसेच धार्मिक विधी संपन्‍न होणार आहेत. दुपारी 2 वाजता उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे.  

 
Top