पांगरी (गणेश गोडसे) पांगरी पोलिस ता.बार्शी  ठाण्याच्या हद्दीतील पांगरी व आगळगांव येथे चो-याच्या घटना घडल्या.आगळगांव येथील चोरीप्रकरणी पांगरी पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून दुचाकीसायकल चोरास चार तासात अटक केली.
    बालाजी अशोक मुळे रा.उक्‍कडगांव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या पांगरी येथे पुणे-लातूर राज्य मार्गावर राजकिरन इरिगेशन अँड हार्डवेअर दुकान असून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानावरील पत्रा उचकटून आत प्रवेश करत गळल्यात ठेवलेले रोख पाच हजार रुपये चोरून नेले.शेजारील अभिमान माणिक गवळी यांचे जय भवानी सायकल मार्ट अश्याच पद्धतीने फोडून आत प्रवेश करून दुकानातील दहा हजार रुपये चोरून नेले.नंतर चोरट्यांनी विक्रांत गरड यांच्या गुरुद्त्त ट्रेडर्सकडे आपला मोर्चा वळवून दुकानात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
   दुसर्‍या आगळगांव येथे घडलेल्या घटनेबाबत प्रकाश कृष्णाथ पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची शेतातील वस्तीवर लावलेली एम.एच.13 ए.व्ही.2660 ही पंचेविश हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली आहे.
 दरम्यान आगळगांव येथील दुचाकी चोरीबाबत पांगरी पोलिसांनी तपास वेगाने करून जयदीप दत्तात्रय जाधव यास अटक केली आहे.ही कारवाई स.पो.नि.सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राजू राठोड,सुधाकर ठाकर,प्रभूलिंग वाघमारे यांनी केली.पांगरी पोलिसात गुन्हे दाखल झाले असून तपास पांगरी पोलिस करत आहेत.

 
Top